गरम पाणी – कोविड लक्षणांमधे अत्यंत फायदेशीर !

Hot Water

पाणी या विषयावर अनेक लेख वाचण्यात येत असतात. पाणी किती प्यावे, कशा पद्धतीने घ्यावे, अति किंवा कमी पाणी हानीकर आहे हे बरेच वेळा सांगितल्या जाते. पाण्याचे तापमान बदलले की गुण बदलतात. थंड पाणी आल्हाददायक, ग्लानी दूर करणारे, दाह कमी करणारे असते. तर गरम पाण्याचे गुण वेगळे असतात.

खाल्लेल्या अन्नाचे ढेकर येणे, लाळ सुटणे, मळमळ होणे, शरीर जड सुस्त वाटणे अशी अपचन अजीर्णाची लक्षणे असतील किंवा पोट दुखणे, मल अपान वायु निस्सरण न होणे, पोट फुगणे असे त्रास होत असतील तर कोमट पाणी पिणे लाभदायक ठरते. पण हे कोमट पाणी अल्प प्रमाणात प्यावे की अन्न पाचन होईल. जास्त प्रमाणात पिण्याने अन्न द्रवीभूत होऊन जाठराग्नि मंद पडते. अजीर्ण अजूनच वाढेल.

उष्ण जल हा उत्तम चिकित्सा उपक्रम आहे. कोविड संक्रमण सुरु आहे. यात निर्माण होणाऱ्या लक्षणांमधे गरम पाणी पिण्यास सांगितले जात आहे. काय आहे या गरम पाण्याचे फायदे ? गरम पाणी करण्याची योग्य पद्धत काय ते बघूया.

दीपनं पाचनं कण्ठ्यं लघू उष्णं बस्ति शोधनम् ।
हिध्माध्मानानिल श्लेष्मसद्यः शुद्धिनवज्वरे ।
कास आम पीनसश्चा पार्श्वरुक्षु च शस्यते ॥

उष्ण जल जठराग्नि प्रदिप्त करणारे आहे, आमपाचन करणारे आहे. कोविड (COVID) रुग्णांमधे प्रथम लक्षण दिसते की भूक लागत नाही, तोंडाला चव नाही, जिभेवर पांढरा स्तर दिसतो या कोविड लक्षणांमधे जठराग्नि वाढविणारे गरम पाणी फायदेशीर ठरणार आहे.

उष्ण जल कण्ठय म्हणजेच कंठाला हितकर सांगितले आहे. कोविड मधे घसा खवखवणे, घसा दुखणे ही लक्षणे दिसतात त्यामुळे कण्ठय असलेले उष्ण जल पिणे लाभदायक ठरते.

  • उष्ण जल पचायला हलके, बस्ति शोधक आहे. त्यामुळे मूत्र प्रवर्तन व्यवस्थित होते.
  • उचकी, पोट फुगणे, वात विकार कफ विकार दूर करणारे आहे. कोविड व्याधीत सर्दी, दम लागणे, पार्श्वशूल म्हणजेच छातीच्या वाम दक्षिण बाजूला दुखणे, खोकला ही लक्षणे उत्पन्न होतात. उष्ण जल ही लक्षणे दूर करणारे आहे. कफ पातळ होऊन कफसंचिती दूर करणारे आहे.
  • उष्ण जल नवज्वरहर आहे. कोविडमधे ताप येतो अशा वेळी गरम पाणी सेवन उत्तम फायदा देतो. आमपाचन होऊन घाम निघण्यास सुरवात होते व ताप कमी होण्यास मदत होते.
  • या गरम पाण्याच्या गुणांचे अवलोकन केले तर कोविड लक्षणांमधे गरम पाणीच पिणे हितावह आहे.

गरम पाणी करण्याची योग्य पद्धत काय ?

  • अष्टमांशशेष, चतुर्थांश शेष, अर्धांश शेष, केवळ १ उकळी आणणे. हे प्रकार उत्तरोत्तर सामान्य गुणाचे आहे.
  • एक अष्टमांश शेष जल म्हणजेच ८00 मिली पाणी १०० मिली होईपर्यंत आटविणे हे ज्वर कमी करणारे आहे. उष्ण
  • जलाचे जे गुण सांगितले आहेत ते यात उत्तम असतात. केवळ १ उकळी आणलेल्या पाण्यात सामान्य असतात.
  • पिण्यायोग्य तापमानावर आले की असे पाणी प्यावे. अशा पद्धतीने तयार केलेले पाणी कोविड रुग्णांनी प्यावे.
  • उपरोक्त पद्धतीने उकळलेले पाणी थंड झाले तरीही ते जड नसते. सर्व त्रिदोषशामक असते. पित्त वाढलेले असेल तरीही त्रासदायक होत होत नाही.असे उष्ण जल शिळे मात्र मुळीच पिऊ नये. ते त्रिदोष कारक ठरते. रोज नवीन तयार करावे.
  • कोरोना संक्रमण वाढतच चालले आहे त्यामुळे आयुर्वेदाच्या या उष्ण जल विश्लेषणाचा आपण नक्की फायदा घेवूया.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button