मनसेकडून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

MNS

ठाणे : कल्याण शहरात एका बोगस डॉक्टराकडून दोन रुग्णालये चालवली जात असल्याची पोलखोल स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. विशेष म्हणजे हा बोगस डॉक्टर इंजिनीअर असल्याची माहिती पुढे येत आहे. अमित शाहू असे  या बोगस डॉक्टराचे नाव आहे.

आरोग्य विभागाने अमित शाहू या बोगस डॉक्टराकडून चालवल्या जात असलेल्या साईलीला आणि माउली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचा परवाना रद्द केला आहे. रुग्णालयाचा परवाना रद्द केल्याने इतर रुग्ण वाचतील; पण ज्यांच्याकडून उपचारापोटी पैसे उकळले आहेत, त्या रुग्णांना न्याय मिळणार का? अमित शाहू आणि या दोन्ही रुग्णालयांच्या मालकावर कधी कारवाई होणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी जोरदार मागणी मनसेकडून केली जात आहे.

कल्याणमध्ये एका रुग्णावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून त्या रुग्णाला आज मृत्यूच्या दारात नेऊन ठेवले. त्यामुळे रुग्णांचे  नातेवाईक आणि मनसेकडून या प्रकरणी संबंधित व्यक्ती आणि डॉक्टरांविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आज बोगस डॉक्टर चालवत असलेल्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER