
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ जानेवारीच्या रात्री अतिदक्षता विभागात आग लागून १० बालकांचा बळी गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भंडाऱ्यात येऊन पाहणी केली मात्र तरीही दोषींवर कारवाई न झाल्याने भाजपाने उद्या, सोमवारी (११ जानेवारीला) भंडारा जिल्हा बंदची हाक दिली आहे.
याबाबत माहिती देताना भंडारा-गोंदियाचे भाजपा खासदार सुनील मेंढे म्हणालेत, महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री येऊन गेलेत. आज राज्याचे मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यात येऊन सुद्धा दोषींवर कारवाई झाली नाही, म्हणून जिल्हा भाजपाने उद्या भंडारा बंदचे आवाहन केले आहे. या प्रकरणी लवकरात लवकर तपास करुन दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला