मनसेने केला ठाण्यात हुक्का पार्लरचा पर्दाफाश

MNS-Hookha Palour

मुंबई : कोरोना (Corona) संकटाच्या काळातही ठाण्यात सर्रास हुक्का पार्लर (Hookah parlor) सुरू आहेत. ठाण्याच्या उपवन परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला . एकीकडे सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) आणि महामारी काळामुळे अनेक वैध व्यवसाय बंद पडलेत तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पण अवैध व्यवसायांवर याचा काहीच परिणाम नाही . ठाण्यातील उपवन परिसरात ठाणे महापौर बंगल्याला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

मनसेचे स्वप्निल महिंद्रकर (Swapnil Mahindrakar) यांनी या हुक्का पार्लरमधील सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. ठाण्यातल्या उपवन परिसरातील कॅफे कोयलाज (Cafe Koyla’s) असं या हुक्का पार्लरचं नाव असून या हुक्का पार्लरच्या आत तरुण-तरुणी हुक्का ओढताना दिसत आहेत. हुक्क्यासोबतच अनेक नशेचे पदार्थदेखील इथे मिळतात असं हुक्का पार्लरमध्ये काम करणारा एक तरुणच व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेला धक्का : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील नागरिकांचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER