शरद पवार यांच्यामुळेच महिलांना सन्मान : मंत्री हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : समाजात पुरुषांच्या बरोबरीने माता-भगिनींचीही संख्या निम्मी आहे. राजकारणात महिलांना निम्म्याहून अधिक जागांवर आरक्षण देऊन शरद पवार यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महिलांनी पक्षाची ध्येय, धोरणे समाजात तळागाळापर्यंत रुजवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी बैठकीत मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीबचाकणकर होत्या.

मुश्रीफ पुढे म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य गोरगरीब बहुजनांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मातीत रुजला आहे. यामध्ये माता-भगिनींचे ही योगदान मोठे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, आमचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून पक्षीय संघटनाच्या बांधणीसाठी महाराष्ट्र भरच्या महिला भगिनीं सरसावल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER