२१ व्या वर्षी सरपंच होण्याचा मान

Sarpanch

रत्नागिरी : बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण असलेली, अवघ्या २१ वर्षांची तरुणी गावाच्या विकासासाठी सरपंचपदावर विराजमान झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील गावकऱ्यांनी कल्याणी जोशी हिच्या हाती गाव कारभाराची धुरा सोपवली आहे. कोकणातील इतक्या लहान वयात सरपंच बनणारी ती पहिलीच तरुणी असून बहुधा राज्यातील ही पहिलीच घटना असावी.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ठिकठिकाणी अनेकांची सरपंच होण्यासाठी धडपड सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यात सर्वांत कमी वयाची सदस्य म्हणून निवे बुद्रुक येथील कल्याणी ही बिनविरोध निवडून आली. गावच्या विकासाचा ध्यास घेऊन कल्याणीने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा विचार पक्का केला होता.

शिक्षित असल्याने गावकऱ्यांनीही तिला लगेचच बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. गाव पॅनेलच्या माध्यमातून ती निवडून आली. त्याचबरोबर तिच्या हातात गावाचा कारभार देण्याचा निर्णयही घेतला. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वांत तरुण सरपंच होण्याचा मान कल्याणीने मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER