कोरोनाच्या संकटात होमिओपॅथी गोळ्या वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद : मंत्री विश्‍वजित कदम

Viswajeet Kadam

सांगली : कोरोनावर लस नसल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविणे हाच उपाय आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फौंडेशन व गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून नागरिकांना होमिओपॅथिक गोळ्याचे वाटप केले जात आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी शनिवारी सांगितले .

गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने महापालिका क्षेत्रासह सांगली व मिरजेतील ग्रामीण भागात पाच लाख नागरिकांना ‘आर्सेनिक अल्बम 30’ या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याची सुरुवात शनिवारी महापालिकेच्या सभागृहात डॉ. कदम यांच्या हस्ते झाली.

यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी समितीचे सभापती संदीप आवटी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह सर्वपक्षीय नगरेसवक उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, कोरोना हे महासंकट आहे. या काळात अनेक सामाजिक संघटना काम करत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करत असलेल्यांना कर्मचारी अधिकार्‍यांसह नागरिकांना पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, कोरोनावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हाच उपाय आहे. केरळ सरकारने होमिओपॅथिक औषधांचे वाटप नागरिकांना केले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. आर्सेनिक अल्बम 30 या औषधाला केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे.

या औषधामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे महापालिका क्षेत्र व सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये पाच लाख नागरिकांना या औषधाचे वाटप करण्यात येणार आहे. लहान मुलांसापासून ते वृध्द, गरोदर, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ति हे औषध घेऊ शकतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER