नख वाढविण्याकरिता करा ‘हे’ घरगुती उपाय…

nail growth

नखे सुंदर दिसणे आणि त्यांना वाढवणे फॅशन समजले जाते, नखे हि कोरीव, सुंदर व थोडी मोठी असल्याने आपल्या हातांची शोभा वाढते. डॉक्टरांच्या अनुसार ज्यांची नखे चांगली असतात त्यांचे आरोग्य नेहमी चांगले असते. डॉक्टर पेशंट ची नखे पाहून देखील त्याच्या आजार बद्दल सांगू शकतात, नखे आणि सुंदर केसांमुळे महिला खूप सुंदर दिसतात. केस आणि नखे एकाच प्रकारच्या प्रोटीन पासून बनलेले असतात आणि त्या प्रोटीन चे नाव आहे केराटीन (Keratin. नखांची वाढ पटकन होते, नख दर महिन्याला १ इंचाच्या १० व्या भागाएवेढे वाढतात, कधी कधी नख वाढण्याचा वेग कमी होतो आणि हि चांगली बाब नाही आहे, जेव्हा आपल्या शरीरात कसली तरी कमी असते तेव्हा नख वाढण्याची गती कमी होते. नखे हळूहळू वाढणे, नखे ठिसूळ होणे, नखांचे तुटणे यासाठी आपल्या जेवणात आलेला बदल कारणीभूत असू शकते. म्हणून पोष्टिक आहार आपल्याला या समस्येपासून वाचवू शकतो. आपण आपल्या नखांची योग्य देखभाल करायला हवी, ज्यामुळे आपली नखे सुंदर व स्वस्थ बनतील.

  • जैतून(olive) :- झोपण्याच्या आधी जैतून चे तेल गरम करून ५ मिनिटासाठी या तेलाने आपल्या नखांची मालिश करावी, १५ ते ३० मिनिटासाठी जैतून च्या तेलामध्ये नखे बुडून ठेवा.
  • संत्र्याचा रस :- :संत्र्याच्या रसामध्ये कमीत कमी १० मिनिटासाठी आपली नख बुडून ठेवा व नंतर गरम पाण्याने धुवा त्यामुळे आपली नखे वाढण्यास मदत होईल व नखे चमकदार होतील.

ही बातमी पण वाचा : डोक्यातील कोंडा दूर करेल साखर आणि कोरफड

  • लिंबाच्या रसाचा :- लिंबाचा रस व जैतूनचा तेल गरम करा. हे कोमट झाल्यावर १० मिनिटासाठी त्यात आपली नखे बुडवून ठेवा नाहीतर लिंबाचा तुकडा घेऊन ५ मिनिट नखांची मालिश करू शकता.

  • नारळाचा तेल :- रात्री झोपण्या आधी नारळाच्या तेलाने आपल्या हाताची व नखांची मालिश करा, यामुळे आपल्या रक्ताचा परीचारण चांगले होईल आपल्याला याचा खूप फायदा होईल, यामुळे आपली नखे वाढण्यास मदत होईल व नख चमकदार होतील.

ही बातमी पण वाचा : नखें रंगवणे इस्लामविरोधी ! देवबंदचा फतवा