मांड्यांवरची टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती उपाय

अनेकदा असे होते की आपण चेहऱ्याचा सौंदर्यावर जास्त लक्ष देत असतो. पण काहीवेळा आपण चेहऱ्याच्या तुलनेत शरीराच्या काही भागांकडे दुर्लक्ष करतो. असाच एक भाग म्हणजे ‘मांडी’. बऱ्याच मुली शार्ट ड्रेस किंवा स्कर्ट घालतांनी दिसतात. मात्र मांडी वर टॅनिंग असल्याने त्यांना चारचौघात लाजिरवाणी होते. असे होऊ नये म्हणून यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्याने तुमच्या मांडीवरची टॅनिंग दूर होईल आणि तुम्ही बिंदास स्कर्ट घालू शकाल.

  • ओटचे पीठ :- मांड्याच्या जवळपासच्या त्वचेचं काळपटपणा दूर करण्यासाठी याने स्क्रब करून डेड स्कीन हटवू शकतात. दोन चमचे ओटमीलमध्ये लिंबू किंवा टोमॅटो रस मिसळा. २० मिनिट तसेच राहून द्या नंतर हलक्या हाताने मसाज करा व नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

  • लिंबू :- लिंबू डेड स्कीन स्वच्छ करण्यासाठी सर्वोत्तम आहे. पाण्यात लिंबाचा रस मिसळून ५ मिनिटासाठी मांड्यांवर लावून ठेवावे नंतर धुऊन घ्यावे.

  • मध :- मध हातात घेऊन पाच मिनिट तेथील त्वचा घासावी. अर्धा तास तसेच राहू द्यावे नंतर पाण्याने धुऊन टाकावे.

  • दही :- डाग मिटवण्यासाठी दही उपयोगी ठरतं. यात ओटचे पीठ, बेसन आणि कणकेचा कोंडा मिसळून स्क्रब तयार करू शकता.

  • काकडी :- दररोज तिथली जागा काकडीच्या स्लाइसने घासावी. हवं असल्यास काकडीवर लिंबू पिळून घ्यावा.

  • टोमॅटो :- मांड्यांवर टोमॅटो पल्प लावावा. २० मिनिटाने धुऊन घ्या.

  • पपई :- पपईचा पेस्ट मांड्यांना लावल्याने त्वचा चमकदार होते. पपई अशुद्धी दूर करण्यात मदत करतं.

  • नारळ तेल :- एक चमचा नारळाच्या तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळून मांड्यांच्या जवळपास लावा. १०-१५ मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. हे काही उपाय केल्यास तुम्हाला लवकरच फायदा होईल.तर नक्की ट्राय करा..