कोरोनाच्या नव्या विषाणुचा धोका; एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, आयुक्त चहल इन अ‍ॅक्शन

Commissioner Iqbal Singh Chahal

मुंबई :- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Coronavirus new strain) आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ब्रिटन (UK) आणि आखाती देशांतून (Middle East countries) मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जाईल. तसेच या प्रवाशांना 14 दिवसांसाठी हॉटेल्स आणि इतर ठिकाणी क्वारंटाईन होणे सक्तीचे असेल. तर इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

उद्या रात्रीपासून एकही फ्लाईट भारतात येणार नाही. मात्र जे लोक आलेले आहेत किंवा येणार आहेत त्यांना सक्तीने क्वारंनटाईन करण्यात येईल. एकही पॅसेंजर थेट घरी जाणार नाही. लंडनहून साधारण १ हजार प्रवाशी परत येतील. त्यांची सगळी सोय केली जाईल. त्यांची सगळी टेस्ट करून क्वारंनटाईन केल जाईल. UK आणि मिडल ईस्टमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना हा नियम लागू राहील. तसेच, परदेशातून येणाऱ्या लोकांसोबत काम करणारे सर्व कर्मचारी हे पीपीई किट घालूनच काम करतील. ५ पेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये. त्याचप्रमाणे गरजू वस्तूंवर कोणताही परिणाम होणार नाही असे निर्देश इक्बाल चहल यांनी दिले आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना (Corona) विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनीही ताबडतोब महानगरपालिकांना आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER