मुंबई पोहोचल्यावर टीम इंडियाच्या सदस्यांना होम कोरेन्टाईनचा सल्ला

Indian cricketers Land In Mumbai - Advised Home Quarantine

ऑस्ट्रेलियामधील (Australia) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) ताबा कायम राखल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) खेळाडू भारतात परतले आहेत. मुंबईत दाखल झालेल्या खेळाडूंना कोरोना (Corona) नियम पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू भारतात परतले आहेत. यातील ५ क्रिकेटर्स मुंबईत पोहचले आहेत. त्यांना पुढील ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टीम इंडियाचा कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणे, ज्येष्ठ फलंदाज रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर, सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाहून मुंबईत दाखल झाले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC कमिशनर) इक्बालसिंग चहल म्हणाले, “खेळाडूंना ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.”

बर्‍याच खेळाडूंना दुखापत झाली असली तरी १९ जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून पराभव करून भारताने मालिका २-१ ने जिंकली आणि त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली.

अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि पृथ्वी शॉ यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अधिकाऱ्यांनी स्वागत केले. संघाचा विजय साजरा करण्यासाठी रहाणेने केकही कापला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER