गृहमंत्र्यांच्या उचलबांगडीची चर्चा ; अखेर काँग्रेसकडून भूमिका जाहीर

Balasaheb Thorat - Maharastra Today

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांची उचलबांगडी होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबतच्या चर्चा राष्ट्रवादीने खोडून काढल्या असून काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्रातील पोलीस विभाग चांगले काम करत आहे. मात्र कुठे जर चुकीचं होत असेल तर कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री अनिल देशमुख योग्य पद्धतीने काम करत असून त्यांचे मंत्रिपद जाईल असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.

दरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत वादावरही थोरात यांनी भाष्य केले. बाळासाहेब थोरात यांनी घेतलेले पक्ष संघटनेविषयीचे निर्णय नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रद्द करतील, अशी चर्चा सुरू असतानाच थोरात यांनी याबाबत खुलासा केला आहे. ‘नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व आहे. कोणतेही निर्णय घेताना आमच्यात समन्वय आहे. पक्षात कोणताही वाद नसून सोशल मीडियातून वाद असल्याचे चित्र निर्माण केलं जात आहे. मात्र असे काही असेल तर आम्ही चर्चेतून प्रश्न सोडवू, असे स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसच्या हातून यूपीएचं अध्यक्षपद जाणार? अनेक पक्ष शरद पवारांच्या बाजूने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER