
मुंबई :- संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या निलंबनानंतर भाजपाने (BJP), महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात घडलेल्या खळबळजनक गुण्यांचा हवाला देऊन गृहमंत्री अनिल देहमुख (Anil Deshmukh) यांना प्रश्न विचारला – गृहमंत्री महोदय, याबाबत आपण काय कारवाई केली? गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
भाजपाने हे प्रश्न ट्विट करून विचारले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये हिंगणघाटच्या घटनेचा उल्लेख आहे – एका तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचे जाहीर करावे.
एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते, या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं. #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/62ghfrb9de
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
दुसरे ट्विट पालघर येथील साधूंच्या हत्येबाबत आहे – महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते; मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री अनिल देशमुख हे काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका!
महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री @AnilDeshmukhNCP काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका ! #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/iMBwe4UXt6
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
तिसऱ्या ट्विटचा संबंध नुकत्याच गाजलेल्या पूजा राठोड संशयास्पद आत्महत्येबाबत आहे – माजी मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो. त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे… मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख साहेब तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल?
मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो, त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे… मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री @AnilDeshmukhNCP साहेब तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल ! #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/rpq2grUUVB
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
चौथे ट्विट आहे शर्जिल उस्मानीबाबत – विकृत बुद्धीचा शर्जिल उस्मानी (Sharjeel Usmani) शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखाते त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही; कारण आपले गृहमंत्री अनिल देशमुख गाढ झोपेत आहेत.
विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री @AnilDeshmukhNCP गाढ झोपेत आहेत. #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/kBcsCySrbP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
पाचवे ट्विट राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील बलात्काराच्या आरोपांबाबत आहे – सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करूनसुद्धा मोकाट फिरत आहे; मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो स्वतःच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहतील?
सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे, मात्र गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी तो स्वतःच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहतील?#ResignAnilDeshmukh pic.twitter.com/1g38MQAt2U
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
सहावे ट्विट पोलीस भरतीबाबत आहे – रात्रंदिवस मेहनत करून पोलिसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच… पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही. मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का?
रात्रंदिवस मेहनत करून पोलीसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच… पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही, मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का? #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/tG3SISuHvq
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
अंबानी स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली आहे. मात्र, राष्ट्रवादीने अनिल देशमुखांकडेच गृह खाते राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला