सीबीआय चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे गृहमंत्र्यांकडून स्वागत

Anil deshmukh

मुंबई : कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यापूर्वी, त्या राज्याची संमती अनिवार्य आहे, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. एका सुनावणीदरम्यान गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, या तरतुदी घटनेच्या संघराज्य संरचनेच्या अनुरुप आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गुरुवारी स्वागत केले आहे.

राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या प्रोफेशनल संस्थेचा दुरूपयोग होतांना दिसत असल्यामुळे आम्ही तिची सरसकट परवानगी काढून घेतली होती. “सीबीआयला राज्यांच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असल्याच्या” मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. असे अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER