‘सभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, गृहमंत्री वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

sambhaji raje bhosale - Walse Patil - Maharashtra Today

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून आक्रमक भूमिका घेत खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी आता सरकारवर आरोप केले आहे. माझ्यावर पाळत ठेवल्याचा दावा स्वतः संभाजीराजेंनी केला आहे. याबाबत संभाजीराजे यांनी ट्विटसुद्धा केले.त्यांच्या या ट्विटनंतर खळबळ माजली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी संभाजीराजेंच्या ट्विटला गांभीर्याने घेत खुद्द त्यांच्याशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले.

छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यादरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आजही सिंधुदुर्ग दौऱ्यात पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे, असा खुलासा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button