
मुंबई :- गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार त्यांनी मुंबई सायबर सेलकडे केली आहे. आज (दि. १६) सकाळी अचानक त्यांचे ट्वीटर अकाउंट लॉक झाले असून सर्व ट्वीट्स डिलीट झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी सतेज पाटील (Satej Patil) यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर अचानक ट्वीट्स दिसत नव्हते. शिवाय सतेज पाटील यांचे नावही नाहीसे झाले होते. ट्विटर प्रोफाईलवरून त्यांचा फोटोही नाहीसा झाला होता. त्यामुळे पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट कोणीतरी हॅक केल्याचा संशय निर्माण झाला होता. परंतु, ट्वीटर अकाऊंट हॅक झाले असते तर आता पर्यंत ट्वीटर अकाऊंटवरून चुकीचा मेसेज हॅकरकडून झळकला असता, पण तसा कोणताही प्रकार घडलेला नसल्याची माहिती मिळत आहे. अकाऊंट हॅक झाले तर अकाउंटवर काहीतरी मेसेज दिसतो. परंतू, पाटील यांच्या अकाउंटवर कोणताही इतर मेसेज दिसत नव्हता. काही आक्षेपार्ह अथवा पाटील यांच्या मताशी विरोधात असे कोणतेही ट्विट करण्यात आले नव्हते. कोणालाही फॉलो अथवा कोणती पोस्ट शेअर, रिट्विट करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे हे तपासानंतरच लक्षात येईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला