पोलिस दलातील रणरागिणींचा गृहमंत्र्यांनी केला गौरव

Anil Deshmukh

मुंबई : नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा सण आहे. यानिमित्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी, समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या तुम्ही देखील पोलिस दलातील दुर्गा आहात, असे ट्विट करून पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

अनिल देशमुख यांनी पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांसाठी भावनिक पत्र लिहले. त्यात म्हटले आहे की, आज नवरात्रीचा नववा दिवस आहे. या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला. याच दिवशी दुर्गा मातेने दानव महिषासुराला पराभूत करून जगाचे रक्षण केले. जशी दुर्गामाता संकटाच्या काळी जनतेच्या रक्षणासाठी धावून येते, त्याचप्रमाणे समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या तुम्ही देखील पोलिस दलाच्या दुर्गा आहात. कोविडच्या काळात समाजाचे रक्षण करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी तुम्ही अतिशय जिकरीने पार पाडली आहे.

तुमचे कार्य पार पाडत असताना अनेक वेळा दोन भूमिका पार पाडाव्या लागतात. जेव्हा तुम्ही समाजातील असंख्य कुटुंबीयांची काळजी घेत असता तेव्हाच तुमच्या कुटुंबीयाची देखील काळजी घ्यावी लागते. तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या खूप सक्षमतेने पार पाडता हे आम्ही अनुभवतो आहे. पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून या राज्यासाठी तुम्ही करत असलेल्या सेवेबद्दल आमच्या सर्वांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER