गृहमंत्री गोपीनाथराव मुंडेंनी दाऊद ते छोटा शकील अशा पाजलं होतं पाणी!

Maharashtra Today

महाराष्ट्राच्या राजकारणात लोकनेता हे बिरुद कमावणारं एकमेवर राजकीय व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे(Gopinathrao Munde). एका सामान्य उसतोड मजूराचा मुलगा ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री असा त्यांचा राजकीय आलेख नेहमी चढताच राहिला. त्यांनी मराठवाड्यासाठी जे काम केलं तितकंच उर्वरीत महाराष्ट्रासाठी सुद्धा आज त्यांचा सातवा पुण्यस्मरण दिन. आजच्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्त्वाचा उजाळा घेण्याचा हा एक प्रयत्न.

९० च्या दशकात बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यातले संबंध सर्वांनाच माहिती आहेत. त्यावेळी मुंबई माफिया शिखरावर होता. अनेक बॉम्बस्फोट व्हायचे. मुंबईच्या गल्लोगल्लीत रक्ताचे पाठ वहायचे. यात फक्त गुंडांचच नाही तर खंडणीला बळी पडलेले बिल्डर, नेते आणि बॉलीवूड सेलिब्रेटींचाही जीव गेला होता. यावर पुर्ण विराम लावायचं काम केलं महाराष्ट्रातल्या एका जिगरबाज गृहमंत्र्यानं, नाव दिवंगत गोपीनाथराव मुंडे. ‘संघर्षयात्री.’ त्यावेळी मुंबई दहशतीखाली होती. ८० आणि ९० च्या दहशकात बॉलीवडचे अनेक चेहरे सिनेमाच्या पर्द्यावर हिरो होते कुणी हिरोईन होतं. त्यांच्या मागे लाखो करोडो लोक दिवाणे होते, मुंबईत मात्र त्यांना घराच्या बाहेर पाऊल ठेवण्याची कैफियत होती. अशा दहशतीच्या वातारवणात जगणाऱ्या सिनेकलाकारांच्या स्मृतीत आजही गोपीनाथराव मुंडे जिवंत आहेत.

तो काळ होता जेव्हा बॉलीवूडच्या पार्ट्यांना अंडरवर्ल्डचे माफिया हजेरी लावायचे. सिनेमातल्या नायकांना एका माफियापासून संरक्षणासाठी दुसऱ्या माफियाची मदत घ्यावी लागायची. लाखोंच्या दिलावर राज्य करणारे नायक, नायिका दाऊदच्या बंगल्यावर त्याच्या मदतीसाठी लोटांगण घालत होते असे अनेक किस्से आज आपल्याला आजही ऐकायला मिळतात. टी- सीरीजचे गुलशन कुमार यांना अंडरवर्ल्डमुळं जीव गमवावा लागला होता. राकेश रोशन(Rakesh Roshan) यांच्यावर झालेला गोळीबार यामुळं प्रचंड दहशतीच्या सावटात बॉलीवूड होतं दहशतीचा हा काळोख दुर सारायला गरज होती एका सुर्याची ते काम केलं गोपीनाथराव मुंडे यांनी.

मुंडे बनले मुबंईचे तारणहार

अशातच १९९५ उजाडलं. कॉंग्रेसची सत्ता गेली. शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं. त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी(Manohar Joshi) मुख्यमंत्री बनले तर गोपीनाथराव मुंडे यांच्यावर उपमुख्यमंत्री पदासह गृहखात्याची जबाबदारी होती. त्याकाळात उद्योजकांना अंडरवर्ल्डची भीती होती. मुंबई जणू ठप्प होती. प्रवाही होती एकच गोष्ट टोळीयुद्धात पाटांसारखं रस्त्यांवर वाहणारं रक्त. हे चित्र बदलायचा वीडा मुंडेंनी उचलला. त्यावेळी सिनेसृष्टीसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम(Dawood Ibrahim), रवि पुजारा, भरत नेपाळी, छोटा शकील यांच्या टोळींचे धमकी वजा फोन प्रतिष्ठीत नागरिकांना यायचे. खंडणी वसुलीसाठी. त्याकाळात ग्लॅमरसाठी अनेक अंडरवर्ल्ड डॉन आणि त्यांच्या टोळीतल्या गुंडांच्या पार्ट्यांमध्ये सिनेजगतातले अनेक प्रतिष्ठीत स्टार असायचे. अंडरवर्ल्डचा विषय गळ्यापर्यंत आला होता. पोलिसांचे व्यवस्थेने बांधलेले हात सोडवण्याची गरज होती. यासाठी सक्षम हातांची गरज होती. ते हात बनले गोपीनाथराव मुंडे.

पोलिसांना मुंबई साफ करण्यासाठी दिली खुली सुट

गोपीनाथ राव मुंडेंनी गृहखातं ताब्यात घेतलं आणि पहिला आदेश पोलिसांना दिला मुंबई साफ करण्याचा. मागच्या सरकारच्या काळात अंडरवर्ल्डशी साठ गाठ असल्यामुळं नेते अंडरवर्ल्डवर कारवाई करण्यास धजावत नसायचे. पोलिसांना कारवाईचे आदेश नव्हते. त्यामुळं दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत गेली. मुंडें यांचा या सर्वांशी काहीच तसुभर संबंध नव्हता. कोणत्याच माफियाशी संबंध त्यांचे नव्हते. त्यांनी ४० हजार पोलिस कर्मचाऱ्यांना माफियांचा खात्म करण्यासाठी लागणारे सर्व अधिकार दिले. पोलिस विरुद्ध माफिया या चकमकी ९० च्या दशकात जनतेसाठी सामान्य झाल्या होत्या. याच काळात इन्काउंटर स्पेशिलीस्ट दया नायक, विजय साळसकर अशी इतर नावं मुंबई पोलिस दलात मोठी झाली.

मुंबई अंडरवर्ल्डमुळं प्रभावित झालेल्या उद्योजकांना आणि फिल्मस्टार्सना अतिरिक्त संरक्षण देण्यात आलं. हळू हळू मुंबई माफियांच्या जाचातून मुक्त झाली. अंडरवर्ल्ड डॉन्सचे अनेक हस्तक पोलिसांच्या चकमकीत मारले गेले. गोपिनाथरावांच्या या कार्यप्रणालीचा पुढच्या काळात स्वीकार करण्यात आला. ते गोपीनाथराव मुंडेच होते ज्यांच्यामुळं मुंबईच्या रस्त्यांना मोकळेपणानं श्वास घेण्याची सवय लागली.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button