गृहमंत्री पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले, चित्रा वाघ यांचा टोमणा

Chitra wagh & Anil Deshmukh

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना स्वत: उत्तर दिले. “हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असे म्हणत तक्रारी लिहून संबंधित विभागातील पोलीस स्टेशनमध्ये कळवल्या. मात्र, गृहमंत्र्यांची ही कार्यतत्परता म्हणजे नौटंकी होती, अशी टीका पुण्यातील भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली. पुण्यातील एका तरुणीवर त्याच रात्री झालेल्या बलात्काराचा दाखला देत ‘गृहमंत्री पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले’ असा टोमणा मारला.

गृहमंत्री अनिल देशमुख शुक्रवारी सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात आलेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी पुणे कार्यालयातील कंट्रोल रुमला भेट दिली. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापून नवीन वर्षाचे स्वागत केले. वायरलेसवरुन कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन तक्रारींच्या काही फोन कॉल्सना उत्तरही दिली. मात्र, ही सर्व नौटंकी होती, असा टोमणा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मारला.

चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन गृहमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख केला. ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात जाऊन पोलीस कंट्रोलरूमला भेट देत पुणेकरांच्या तक्रारी ऐकण्याची नौटंकी केली. मात्र, त्याच पुण्यात ३१ तारखेला खराडी कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या २० वर्षीय तरुणीची गाडी अडवून मारहाण करत तिच्यावर बलात्कार झाला याची साधी दखलही घेतली नाही!

महिला सक्षमीकरण…सशक्तीकरण या घोषणा हवेतचं विरल्या…राज्यातल्या लेकीबाळींवर बलात्कार होत आहेत आणि त्याची खुद्द गृहमंत्र्यांनी दखल न घेणे हे संतापजनक आहे, अशी टीकाही वाघ यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER