‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आज आंध्रप्रदेशात

Anil Deshmukh-disha-act

मुंबई : महिलांवरील अत्याचारांविरोधात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने आंध्रप्रदेशने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज आंध्रप्रदेशला जाणार आहेत. याबाबत देशमुख म्हणाले, ‘महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलद गतीने चालवून या घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी उपाययोजना करण्यास शासन प्राधान्य देत आहे.

त्यासाठी प्रभावी ठरेल असा नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहोत. या दौऱ्यात गृहमंत्र्यांसोबत गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण), शंभुराजे देसाई, गृह विभगाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या अस्वती दोरजे हे सोबत असणार आहेत.

हिंगणघाट जळीत प्रकणातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?