‘हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय!’

Anil Deshmukh

मुंबई : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुणे पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी स्वत:च या सेवांची पाहणी केली आणि काही लोकांना फोन करून खात्रीही करून घेतली.

गृहमंत्र्यांनी सेवा सर्व्हिसच्या माध्यामातून तक्रारकर्त्यांशी स्वतः संवाद साधला . फोनवर गृहमंत्री आपल्याशी बोलताहेत याचा तक्रारकर्त्यालाच धक्का बसला. पोलिस स्टेशनलाही याबाबत कोणतीच पूर्वकल्पना नव्हती .

या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी पुण्यातल्या कोथरुड पोलिस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी सर्व कर्मचारी त्यांना माहिती देत होते. तर देशमुखही बारीकसारिक माहिती विचारत आढावा घेत होते. हा आढावा घेत असताना त्यांनी तक्रारदार दिलीप पवार यांना फोन केला. पवारांना आपल्या तक्रारीची दखल खुद्द गृहमंत्री घेतील याची स्वप्नातही कल्पना नव्हती. “हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय!” असं पलीकडून आवाज आल्याबरोबर त्यांना धक्काच बसला.

दरम्यान दररोज किती तक्रारी येतात, किती तातडीने त्याची दखल घेतली जाते, किती लवकर त्यावर उपाययोजना केल्या जातात याचीही माहिती गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतली.क्रारी येतात. किती तातडीने त्याची दखल घेतली जाते, किती लवकर त्यावर उपाययोजना केल्या जातात याचीही माहिती गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली .