गृहमंत्री अमित शहा ६ फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर

Amit Shah

सिंधुदुर्ग :- देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) ६ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पडवे मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. अमित शहा हे दुपारी १.५० वाजता गोवा येथून हेलिकॉप्टरने पडवे मेडिकल कॉलेज येथे येणार असून उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ते दोन तास सिंधुदुर्गात थांबणार आहेत.

अमित शहा यांच्या दौऱ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह अनेक आमदार, खासदार व भाजपची (BJP) नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजपा सिंधुदुर्गात सह्यांची मोहीम राबविणार आहे.

भाजपसाठी हा दौरा निश्चितच फलदायी आहे. केंद्रांच्या योजना घराघरांत पोहचविण्याचे आवाहन जिल्हा कार्यकारिणीत करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणीची बैठक ओसरगाव महिला भवनमध्ये घेण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, आ.नितेश राणे, जि.प.अध्यक्ष समिधा नाईक आदींसह लोकप्रतिनिधी, कार्यकारिणी, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER