केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये दाखल

Amit Shah

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पुन्हा एकदा ‘एम्स’ (AIIMS)मध्ये दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवास करण्यास त्रास होत असल्याने शाह यांना रात्री ११ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमित शाहांना कोरोनाची (Corona) लागण झाली मात्र उपचारानंतर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र शनिवारी पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमित शाह यांची प्रकृती स्थिर आहे. शाह यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी (12 सप्टेंबर) रात्री 11 वाजता अमित शाह यांना ‘एम्स’मध्ये दाखल केले. गेल्या दीड महिन्यात त्यांना तिसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER