होम आयसोलेशन पूर्णपणे बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावे लागेल भरती; राजेश टोपेंनी केले जाहीर

Rajesh Tope-Home Isolation

मुंबई : होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात यापुढे कोणीही होम आयसोलेशन राहणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच ठेवण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली १८ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असे टोपे यांनी सांगितले.

लसीकरणासाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले होते. याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. केंद्राने लसी आयात कराव्यात आणि राज्यांना पुरवाव्यात, अशी मागणी टोपेंनी केली. १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्याची आहे, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button