५ लाख ५२ हजार ६३७ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

Home Delivery Alcohol

मुंबई : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे ते 29 मे 2020 या काळात 5 लाख 52 हजार 637 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. आज दिवसभरात 58 हजार 231 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 35 हजार 513 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 7,291 अनुज्ञप्ती सुरू आहेत.

राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 1 मे 2020 ते 28 मे 2020 या काळात 1 लाख 14 हजार 224 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 02 हजार 712 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

ही बातमी पण वाचा : मुंबई : ऑनलाईन मद्य विक्री, फसवणूक टाळण्यासाठी फक्त कॅश ऑन डिलिव्हरी

दि. 24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उपआयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. दि.28 मे, 2020 रोजी राज्यात 130 गुन्हे नोंदविण्यात आले असून 46 आरोपींना अटक करण्यात आली असून 12 लाख 76 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.24 मार्च, 2020 पासून दि.28 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6,666 गुन्हे नोंदविण्यात आले असून 3,089 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 641 वाहने जप्त करण्यात आली असून 17 कोटी 68 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून [email protected] ई-मेल आहे.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER