एका क्लिकवर ड्रग्ज, बंदूका, बॉम्बची होते होम डिलेव्हरी, भारतासमोरचं सर्वात मोठं आव्हान ‘डार्क वेब’!

Internet - Maharashtra Today

आज जमाना बदललाय, सगळ काही घर बसल्या घरपोच होतं. एका क्लिकवर. अनेक इ- कॉमर्स साइट्स अशा सुविधा पुरवत आहेत. आता काही दिवसांपासून गरजेच्या वस्तूंसह औषधंसुद्धा पोहचत आहेत. पण काही ठिकाणी इंटरनेटा इतका गैरवापर होतोय की थेट चरस, गांजा आणि ड्रग्जसारखे अंमली पदार्थ डिलीव्हर केले जात आहेत. ‘डार्क वेब’च्या माध्यमातून अंमली पदार्थांचा काळाबाजार सुरु आहे. डार्क वेबवरुन हा व्यापार होतो. देशातल्या युवकांसाठी नुकसानकारक गोष्ट असल्याचं तज्ञांच म्हणनं आहे. यावर बंदी आणून तातडीनं संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी होत असली तरी त्यांच्या पर्यंत पोहचणं इतकंही सोप्प उरलेलं नाहीये.

काळ्याधंद्याचं काळं जग डार्क वेब

डार्क वेब म्हणजे इंटरनेटा एक असा कोपरा जिथं सर्व काळे धंदे चालतात. आपण वापरत असलेलं इंटरनेट हे एकूण इंटरनेटच्या विस्तारापैकी फार तोकड्या वाटणीच आहे. म्हणजेच एक इंटनेटची मोठी व्याप्ती आपल्यापासून लपवण्यात आली आहे. त्याला ‘डीप वेब’ म्हणलं जातं. डीप वेवचा सामावेश हा गुगल किंवा बिंग सारख्या सर्च इंजिनमधून होत नाही. याच डिप वेबचा एक तुकडा असतो डार्क वेब. इथले अनेक हजारो, शेकडो वापरकर्ते अनोळखी राहून काळेधंदे करतात. यामध्ये मोठ्याप्रमाणात चालणाऱ्या अमंलीपदार्थांचा व्यवसाय हा २०१५ला अब्जावधी डॉलर्सच्या घरात पोहचलाय. एकट्या अमेरिकेत हे चित्र आहे. यावर वारंवार वेगवेगळे अहवाल प्रकाशित होत असतात. उर्वरीत जगातला हा अकडा बऱ्यापैकी मोठा असू शकतो असं तज्ञांच मत आहे.

डार्कवेबचा इतिहास

लष्कराच्या गोपनीय इतरांच्या हाती लागू नये म्हणून १९९० ला डार्क वेबची सुरुवात झाली. अमेरिकनं लष्करानं सर्वात आधी याचा पाया रचला. यानंतर लष्करासाठी बनलेल्या या सुविधेचा फायदा उचलायला सुरुवात झाली. सायनाइड या विषारी पदार्थापासून ते स्फोटकं, बंदूका, बॉम्ब, विध्वंसक हत्यारं मिळतात. शिवाय सुपारी घेऊन हत्या करणाऱ्यांशीही इथं संबंध साधणं शक्य आहे. जगभरात अमेरिके इतके प्रगत तंत्रज्ञान सुरक्षाविषयक विषयांमध्ये नाही. बेकायदेशीर कार्यपद्धतीला लगाम लावता येईल. फसवेगीरी रोखता येईल यावर प्रयत्न सुरु आहेत पण अपुऱ्या साधन सामग्रीमुळं तिथं मोठा आभाव आहे.

भारतात परिस्थीती काय?

भारतीय युवकांना डार्कवेब प्रचंड आकर्षित करतं आहे. भारतातले ७ कोटीहून जास्त लोक अंमली पदार्थ्यांच्या विळख्यात आहेत. २०१६ला सामाजिक न्याय मंत्रालयानं ‘ऑल इंडीया इन्सटीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस’सोबत केलेल्या सर्व्हेमध्ये यंदाचा अहवाल मिळाला होता. यावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणं गरजेचं आहे. डार्क वेब मधलेल कोड नेहमी बदलतअसतात. त्यामुळं पोलिस आणि गुप्तचर संघटनांना त्यावर निर्बंध लादणं अशक्यप्राय होऊन जातं. घरांमध्ये परिस्थीती अशी आहे की पालकांपेक्षा मुलांना जास्त मोबाईल आणि इंटरनेटमधील ज्ञान अधिक आहे. त्यामुळं मुलांवर नियंत्रण ठेवणंही कठीण होऊन बसतं. दिवसेंदिवस वाढत चालेला डार्क वेबचा व्यापार आता १२० कोटी अमेरिकी डॉलर प्रतिवर्ष इतका वाढलाय.

डार्कवेबने अनेकांचे बुर्खे फाडलेत

सरकार नागरिकांसोबत करत असलेले गैरव्यवहार. त्यांच्या खासगी आयुष्यावर ठेवत असलेली पाळत आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणण्यासाठी अनेक पत्रकार डार्क वेब वापरतात. अनेक मोठी प्रकरणं बाहेर पाडण्यासाठी डार्क वेबचा वापर होतो. भारता सारख्या विकसनशील देशात डार्क वेबमुळं मोठा परिणाम घडवून आणणं शक्य आहे.

सदरील माहिती पुस्तक, वर्तमान, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button