
रत्नागिरी(प्रतिनिधी): लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांना सकस आहार, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना पोषण आहार मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागाने उत्तम कामगिरी केली आहे.
लॉकडाऊनमध्ये एकही बालक, गरोदर महिला आणि स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. आवश्यक तेवढा पोषण आहार उपलब्ध आहे. हा आहार शाळा, अंगणवाड्या बंद असल्या तरी अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच दिला जात आहे. गावागावात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी लॉकडाऊनच्या काळाच्या जिल्ह्यातील लहान मुले आणि गरोदर माता मिळून ६२ हजार १४२ जणांना घरपोच पोषण आहार दिला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला