पुतळा अनावरणाचा वाद पेटला पवारांसोबत जावू नका : होळकर कुटुंबाचे संभाजी राजेंना पत्र

Yuvraj Bhushan Holkar-Sambhajiraje

मुंबई :- जेजुरी गडावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या पुतळ्याचा कार्यक्रम धनगर आणि मेंढपाळ युवकांनी गनिमी कावा वापरत आज पहाटे केले. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सदर प्रकाराबद्दल  गुन्हा दाखल करण्यात आला आहे  त्यामुळे  राजकीय वातावरण तापले आहे.

त्यातच उद्याच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणे बाबत आपण विचार करावा असे पत्र होळकर घराण्यातर्फे खासदार छत्रपती संभाजीराजे यांना देण्यात आले आहे. अनावरण करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांना होळकर कुटुंबीयांनी पत्र लिहिले असून, त्या पत्रामधून पवार यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

इंदूरच्या होळकर घराण्यातील भूषणसिंहराजे होळकर यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये होळकर म्हणतात की, होळकर घराणे आणि छत्रपती घराण्याचे संबंध अनेक पिढ्यांपासूनचे आहेत. दोन्ही घराण्यांनी समाजहितासाठी काम करून लोकमान्यता मिळवली आहे. आपला पूर्ण सन्मान ठेवून आपणास एक बाब निदर्शनास आणून द्यायची आहे. जी आपल्यापासून मुद्दामहून लपवली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र करून स्वराज्य उभारले. नंतरच्या काळात छत्रपती घराणे व होळकर घराणे यांनी सोयरिकही केली. बहुजन समाज एक होऊन राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी हा त्यामागचा हेतू होता.

परंतु आता होळकर घराण्याच्या समृद्ध सामाजिक कार्याचा उपयोच करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या माध्यमातून होत आहे. समाजाचे अनेक प्रश्न असताना फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करून आपला हेतू साध्य करणे हा त्यांचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून कथित विदेशी मूळचे होळकर ज्यांना येथील तत्कालिन सरकार आणि समाजाने नाकारले. आपले आजोबा श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज ज्यांच्याविरोधात होते. अशा व्यक्तींच्या उपस्थितीत जेजुरी येथे कार्यक्रम घेत आहेत. हा माँसाहेबांच्या कार्याचा अवमान आहे, अशी समस्त बहुजन समाजाची भावना आहे. होळकर घराण्याच्या परंपरेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकामध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे, अशा व्यक्तींना महाराष्ट्रात जेजुरी गडावर पुतळा अनावरणाचे आमंत्रण देऊन चुकीचा संदेश देण्याचे आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे, याचा विचार आपणाकडून व्हायला हवा, असे छत्रपती संभाजीराजे यांना लिहिलेल्या या पत्रात होळकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी पेरलेल्या घाणेरड्या राजकारणाची मुळं महाराष्ट्रात रुजत असतील तर त्याचे दीर्घकालीन परिणाम हे समाजाला भोगावे लागतील. याची आपणासही जाणीव असेलच. त्याऐवजी एखाद्या शहीद जवानाची वीरमाता किंवा पत्नी, शेतकरी, मेंढपाळ यांनी हे अनावरण केले असते तर तो माँसाहेबांच्या कार्याचा गौरव ठरला असता, असेही या पत्रात म्हटले आहे.

जेजुरी गडावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवारांच्या हस्ते आणि तुमच्या अध्यक्षतेखाली होणार होते. मात्र त्यापूर्वीच या पुतळ्याचा कार्यक्रम धनगर आणि मेंढपाळ युवकांनी आज पहाटे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत बहुजन समाजात किती अस्वस्थता आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. त्यामुळे बहुजन समाजाच्या भावनांचा आदर करून या कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याबाबत तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो, असे आवाहन या पत्रामधून करण्यात आले आहे.

जेजुरीच्या मार्तंड देव संस्थानाकडून जेजुरी गडावर उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या १२ फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे, या कार्यक्रमाला छत्रपती खा. संभाजीराजे, होळकर घराण्याचे युवराज यशवंतराजे हेदेखील उपस्थित राहणार आहेत, मात्र तत्पूर्वी यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह आज पहाटे साडेपाच वाजता जेजुरी गडावर पोहचले, अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण

झाल्याची घोषणा त्यांनी केली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पडळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि मार्तंड देव संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली.
अनिल देशमुख म्हणतात

जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण नाही. कार्यकर्त्यांनी स्टंटबाजी केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे दिली.

Bhushan Holkar Letter

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER