
कोल्हापूर : मागील आठवड्यात लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे तब्बल तीन लाख पर्यटक आणि भाविकांनी कोल्हापूरला (Kolhapur) भेट दिली. यातील अनेक पर्यटक कोल्हापुरात एक मुक्कम करीत गोवा, कोकणाकडे गेले. कोरोनामुळे आठ महिने बंद राहिलेल्या व्यवसायाला अर्थिक आधार मिळण्यास मदत झाली आहे.
दिड महिन्यापासून पर्यटकांचा ओघ कोल्हापुरात सुरू झाला अद्यापि परदेशी विमान सेवा बंद आहे. रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे बहुतांशी पर्यटक खासगी चार चाकी गाड्या किंवा आराम बस, एसटी बसचा आधार घेत पर्यटनास कोल्हापूरमध्ये आले.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनासाठी सलग तीन दिवस गर्दी कायम राहिली आहे. शुक्रवारपासून मंदिरात मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध झाली असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसात 60 हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले तर काल 20 हजारहून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.
अजूनही रोज नव्या कौटूंबीक पर्यटकांचा ओघ शहरात येत आहे. शनिवार, रविवार व नाताळनंतरच्या सलग सुट्टीच्या काळात सर्वाधिक पर्यटक येथे आले होते. यातील जवळपास 30 टक्के पर्यटकांचा एक दोन दिवसाचा मुक्काम कोल्हापूरात राहीला तर बहुतांशी पर्यटक एका दिवसात पुढील प्रवासाला निघाले. या कालावधीत सर्वाधिक पसंती कोल्हापुरातील खाद्य पदार्थाला होती.
कोल्हापूर खाद्य संस्कृती मसांहारी जेवण, मिसळसह अन्य पदार्थ आहेत. त्याला पर्यटकांची पसंती आहेत याशिवाय इंडीयन, साऊथ इंडीयन, इटालियन पदार्थापासून ते तंदुरी चिकन पर्यंतचे चविष्ठ खाद्य पदार्थ खाण्यासाठी कोल्हापूराच्या हॉटेल्स पसंती आहे परिणामी गेल्या ती दिड महिन्यात हॉटेल समोर गर्दी वाढत दिसत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला