राज्यातील शाळांना १ मेपासून सुटी जाहीर; १४ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष

School - Maharashtra today
School - Maharashtra today

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मेपासून सुटी जाहीर झाली आहे. १ मे ते १३ जून असा सुटीचा कालावधी आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन शाळेतून सुटी मिळाली आहे. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार आहे. याबाबत शिक्षक संघटनेकडून वारंवार मागणी केली जात होती.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुट्या  दरवर्षी शिक्षण संघटनेकडून निश्चित केल्या जातात. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवले आहे.

यानुसार १ मे ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुटीचा कालावधी आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष १४ जून २०२१ रोजी तर विदर्भातील तापमान लक्षात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर २८ जून रोजी शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button