राजू शेट्टी यांनी केली कृषी विधेयकाची होळी

Raju Shetti - Agriculture Bill

कोल्हापूर :- स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज आपल्या घरातच्या दारात केंद्रीय कृषी विधेयकाची होळी केली. वापस लो वापस लो कृषी विधेयक वापस लो अशा घोषणा राजू शेट्टी यांनी दिल्या. दरम्यान कृषी विधेयकाविरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. याबंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही राजू शेट्टी यांनी यानिमित्ताने केले.

केंद्रातील भाजप (BJP) सरकारने बहुमताच्या आधारे शेती आणि कामगार धोरणविषयक कायदे मंजूर करून शेती क्षेत्र भांडवलदार व्यापाऱ्यांना खुले केले आहे. या विरोधात अनेक राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरलेले असतानाच कामगारांना नोकरीची शाश्वती नाकारणाऱ्या, ३०० पर्यंत कामगार असलेले उद्योग विनापरवानगी बंद करण्यास मान्यता देणाऱ्या कायद्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे. शेतकरी आणि कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा देशव्यापी निषेध केला जात आहे. कृषी क्षेत्राला कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालणारा हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER