
कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शुक्रवारी बिंदू चौकात (Bindu Chowk) शेतकरी विरोधी तीन कृषी विधेयके (Agriculture Bill) व वीज बिल विधेयक २०२०ची होळी केली. दिल्लीच्या वेशीवर गेली ५१ दिवस सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची केंद्राने दखल घेवून कायदे मागे घ्यावेत. अन्यथा हे आंदोलन अधिक तिव्र होईल असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचन्द्र कांबळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत यादव, समितीचे निमंत्रक नामदेवराव गावडे, शेतकरी कामगार पक्षाचे संभाजीराव जगदाळे यांची भाषणे झाली. यावेळी अनिल चव्हाण, रवी जाधव, टी. एस. पाटील, शंकर काटाळे, कुमार जाधव, सुभाष सावंत, मुकुंद वैद्य, रमेश वडणगेकर, वाय. एस. पाटील, मधुकर हरेल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला