राज्य शासनाच्या आदेशाची भाजपकडून होळी

BJP

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल देशाच्या कोणत्याही बाजारपेठेत राज्य आणि केंद्र शासनाला सेस न भरता विक्री करण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. मात्र, राज्याचे सहकार व पणन मंत्र्यांनी जाणीवपूर्वक स्थगिती दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात निदर्शने करून स्थगिती आदेशाची होळी केली.

भाजपा (BJP) कोल्हापूर जिल्हा अध्यक्षसमरजीत राजे घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांची आग्रही मागणी असलेल्या तीन कृषी वैधायकांना मंजुरी देऊन कायद्यात रूपांतर करण्यात आले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल देशाच्या कोणत्याही बाजारपेठेत राज्य आणि केंद्र शासनाला कोणताही सेस न भरला विक्री करण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोड़े, जिल्हा संघटन सरचिटणीस शिवाजी बुवा, विलास पाटील, हंबीरराव पाटील, सुलोचना नार्वेकर, स्वाती पाटील, ज्योती सुतार, रणजित जाधव, गजानन सुभेदार, नामदेव पाटील, बाबासो पाटील, विशाल पाटील, अजय चौगुले, संजय शेलार, बबन पडवळ, प्रकाश पाटील, उमेश पाटील, अरुण पाटील. नितीन देसाई, अनिल शिदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER