‘हिटमॅन’ रोहित शर्माने चालत्या बसच्या छतावर मारले षटकार; पाहा व्हिडीओ

Rohit Sharma Video

IPL च्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सराव सत्रादरम्यान एक असा षटकार लावला की चेंडू थेट मैदानाबाहेरून जाणाऱ्या बसच्या छतावर लागला. क्रिकेटमध्ये मोठे शॉट्स मारण्याचे कौशल्य असलेला रोहित शर्मा आक्रमक फलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे.

पण या क्षणी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये रोहितने आपल्या IPL टीम मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात एक षटकार ठोकला होता, ज्यामुळे चेंडू सरळ मैदानाबाहेरून जाणाऱ्या बसच्या छतावर पडला.

रोहित शर्माने मारला ९५ मीटर लांब षटकार
IPL २०२० च्या सलामीच्या सामन्याआधी अबुधाबीच्या शेख जयाद स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा संघ जोरदार सराव करीत आहे. दरम्यान, MI संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात रोहित शर्मा हा षटकार मारताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, कसा रोहित शर्मा फुल ऑफ लेंथला पायांचा वापर करून षटकार मारतो.

रोहितच्या या शॉटमध्ये इतके सामर्थ्य होते की चेंडू थेट मैदानाबाहेर धावणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बसच्या छतावर आदळला. रोहित शर्माच्या या सिक्सची लांबी ९५ मीटर आहे. अशा परिस्थितीत त्याचा अनोखा सिक्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वेगाने व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहतेही रोहितच्या या शॉटचे कौतुक करत आहेत. येत्या आयपीएलचा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी CSK आणि MI यांच्यात खेळला जाणार आहे.

IPL मध्ये २०० षटकाराजवळ रोहित शर्मा
मैदानावर लांब षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्माकडे मोठे कौशल्य आहे. मग ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा आयपीएल. अशा परिस्थितीत जर आपण इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान रोहित शर्माच्या फलंदाजीतून आलेल्या षटकारांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हिटमॅन रोहित शर्माने १८८ आयपीएल सामन्यांत १९४ षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित सर्वाधिक षटकार ठोकणारा चौथा भारतीय आहे. त्याशिवाय आयपीएल १३ दरम्यान रोहित शर्मा हादेखील या स्पर्धेत आपल्या षटकारांचे दुहेरी शतक पूर्ण करताना दिसणार आहे. इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय टी -२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक १२७ षटकार लगावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER