हेनरी फोर्ड यांचं पुस्तक वाचून हिटलर बनला होता ज्यू विरोधक !

Henry Ford

हिटलर आणि हेन्री फोर्ड आपआपल्या क्षेत्रातले जायंट प्लेअर. संपूर्ण जगावर आर्यांचं राज्य असावं ही भावना ठेवून अक्ख्या दुनियेला युद्धाच्या खाईत लोटणारा हिटलर आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण जगभरातल्या रस्त्यांवर आपल्या कार धावाव्यात असं स्वप्न पाहणारा फोर्ड कंपनीचा मालक हेनरी फोर्ड. या दोघांची कधी  भेटही झाली नाही. पण एक योगायोग असा आला की, हिटलरला ज्यू विरोधाची ‘वैचारिक’ बैठक फोर्ड यांच्या लिखाणामुळं मिळाली.

अडॉल्फ हिटलर  सैन्यदलातील साधारण शिपाई ते जर्मनीचा राष्ट्रध्यक्ष बनलेला असा महत्त्वकांक्षी व्यक्ती ज्याने पुन्हा कंबर कसली होती संपूर्ण जगावर विजय मिळवायची. दुसरं महायुद्ध सुरु होण्याचं आणि संपण्याचं कारण बनलेल्या हिटलरने सबंध जगाला युद्धभूमित बदललं. आणि हाच हिटलर अमेरिकेच्या एका उद्योजकाकडून प्रेरित झाला होता. हेनरी फोर्ड… अधुनिक कार व्यवसायकाचा जनक.

नखानं मित्रांचे घड्याळं दुरुस्त करणाऱ्या फोर्ड यांनी कौशल्याच्या जोरावर जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांचा यादीतस्थान मिळवलं. त्यांनी शेती करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती मात्र. फोर्ड यांना आसमंत कवेत घ्यायचा होता.

फोर्ड यांनी १८९१ मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांच्या कंपनीत अभियंता म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि १८९६ मध्ये त्यांनी पहिली चार चाकी कार तयार केली. बल्बचा शोध लावणाऱ्या एडिसन यांनी फोर्ड यांना या कामात मोठी मदत ही केली.

नंतरच्या काळात काही पैशांची जमवाजमव करुन फोर्ड यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राचं नशीब कायमस्वरुपी बदललं तो दिवस होता. १६  जून १९०३ फोर्ड कंपनीच्या स्थापनेचा. या दिवसानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्रचंड मेहनत आणि व्यवसायातील सटीक नियोजनामुळं थोड्याच कालावधीत फोर्ड जगभरातील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या पंगतीत जावून बसले.

व्यवसायात चढउतार हे आलेच. शिखर स्थानावर असलेल्या फोर्ड यांना ही याचा सामना करावा लागला. १९२७ पर्यंत जगभरातली बाजारात फोर्डला प्रतिस्पर्ध्यांमुळ मोठं नुकसान झालं. फोर्ड निराशेच्या गर्तेत सापडत गेले. त्यांच्यात नकारात्मकता आणि द्वेष भावना वाढीस लागली.

अमेरिकेचे महान राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या एका ज्यू व्यक्तीने केल्याचे त्यांनी कुठं तरी ऐकलं आणि आता ही गोष्ट सिद्ध करण्याचा निश्चय त्यांनी केला. हळूहळू ज्यू धर्मियांबाबत त्यांच्या मतांनी घृणेच रुप घेतलं. आणि हाच तो रस्ता होता ज्यावर हिटलशी त्यांची भेट होणार होती.  १९१९ ते १९२७ च्या एका वर्तमानपत्रातील लेखांच्या माध्यमातून हेनरी फोर्ड यांनी ज्यू धर्मियांविरोधात भडास काढायला सुरुवात केली. ज्यू धर्मियांनी अमेरिकेच्या महान संस्कृतीचा नाश केला असं त्यांच मत होतं.

पुढं या सर्व लेखांना पुस्तकाचं रुप देण्यात आलं ज्याचं नाव होतं ‘ द इंटरनॅशल ज्यू :  द वर्ल्ड्स फॉरमोस्ट प्रॉब्लम.‘ हिटरलच्या नाझी जर्मनीतील सर्वाधिक खपाचं हे पुस्तक बनलं.

स्वतःला शांतीदूत मानणाऱ्या फोर्ड यांनी घेतलेल्या या भूमिकेविरुद्ध अमेरिकेतील विचारवंत व टिकाकारांनी त्यांची निंदा सरु केली पण ज्यू लोकांचा विरोध करणारे फोर्ड हिटलरसाचे सर्वात प्रिय अमेरिकन व्यक्ती होते. ज्यांच्यामुळे हिटरला ज्यू विरोधी नाझी विचारधारेसाठी लागणारी वैचारिक सामग्री पुरवली. अशी नोंद हिटलरने ‘माइन काम्फ‘ या आत्मचरित्रात केली आहे.

फोर्ड जेव्हा वर्तमानपत्रातून ज्यूंवर टीका करत होते तेव्हा दुरवर जर्मनी नावच्या देशात हिटलर संघर्ष करत होता. जगण्यासाठी. पुढे तो राजकारणाकडे वळला आणि संपूर्ण जर्मनीची सत्ता त्यानं हाता घेतली. नाझी विचारांनी त्याचं सिंहासन मजबूत केलं आणि या विचारा मागं प्रेरणा होती फोर्ड यांच्या विचारांची. आता हिटलर सर्वशक्तीशाली होता पण वेळ होती. गुरु दक्षिणेची.

हिटरलच्या नाझी विचारांचा पाया घालणाऱ्या फोर्ड यांच्या ७५ व्या वाढदिवशी जर्मनी बाहेरील नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार ‘जर्मन ईगल्स गॉड क्रॉस‘ हा पुरस्कार देवून १९३७ ला सम्मानितं केल.

फोर्ड यांच्यावर अनेकदा टीका झाली तर अनेकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. कामगारांना सुखसोई मिळाल्या तर ते गुणवत्ता पुर्ण काम करु शकतात याची जाणीव त्यांना होती त्यामुळे कामगारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. इतर व्यवसायांपेक्षा फोर्ड कंपनीतील वेतन जास्त असायचे. कुणाचे विचार कुणाला कशाप्रकारे प्रभावित करतील ही योगायोगीच गोष्ट. पण या एका योगायोगानं जगाला विनाशाच्या खाईत लोटलं होतं.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER