शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पंकज देशमुख हाती बांधणार शिवबंधन

Pankaj Deshmukh-CM Thackeray

मुंबई : आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra-thakur)यांच्या बहुजन विकास आघाडीचे युवा नेते आणि क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख (pankaj-deshmukh)शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पंकज देशमुख आज मंगळवार 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्क प्रमुख रवींद्र पाठक उपस्थित असणार आहेत.

पंकज देशमुख यांच्यासोबत वसई तालुक्यातील इतर समाजातील 4 प्रमुख नेतेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकी आधी बहुजन विकास आघाडीला हा खूप मोठा धक्का आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंकज देशमुख यांनी एक फेसबुक पोस्टही केली होती, त्यामुळेही ते चर्चेत आले होते.
पंकज देशमुख यांची फेसबुक पोस्ट :

गेल्या एक दशकाहून अधिक काळ समाजकारणाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्ष परिवारात हितेंद्र ठाकूर, राजीव पाटील, उमेश नाईक, क्षितीज ठाकूर, सिद्धार्थ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत एक पक्ष कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत होतो. या पक्षात संपूर्ण क्षमतेने कार्य करण्याची बहुमोल संधी मला दिल्याबद्दल पक्षनेतृत्व, सर्व जेष्ठ नेतेमंडळी, नगरसेवक आणि सहकार्य केल्याबद्दल सर्व आजी माजी महिला, पुरुष व युवा पदाधिकारी, सहकारी, हितचिंतक मित्र परिवार आणि वेळोवेळी तसेच कठीणसमयी भक्कम पाठिंबा आणि मार्गदर्शनरुपी राजकीय साथ दिलेल्या कुटूंबियांचे शतशः जाहीर आभार.

सदर कार्यकाळात कळत नकळत माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची मनःपूर्वक क्षमा मागतो. मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून व्यक्तिगत जीवनात आपले प्रेम, नातेसंबंध, आपुलकी यापुढेही अशीच कायम राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER