इतिहास लिहिला जाईल, तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे ; सदाभाऊंचा शरद पवारांवर घणाघात

Sadabhau Khot - Sharad Pawar

मुंबई :- रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात , अशा शब्दात खोत यांनी पवारांवर घणाघात केला .

पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले .

दरम्यान सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. येत्या 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार हतबल, EWS मधून मराठ्यांना आरक्षण नको ; शरद पवारांनी स्वतः लक्ष घालावं – संभाजी राजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER