नागालँडमध्ये इतिहास : ५८ वर्षांमध्ये विधानसभेत पहिल्यांदा वाजली राष्ट्रगीताची धून

Nagaland

नवी दिल्ली : नागालँड (Nagaland) विधानसभेत तब्बल ५८ वर्षांनंतर १२ फेब्रुवारीला राष्ट्रगीत वाजवण्यात आले. या घटनेची नोंद नागालँडच्या इतिहासात झाली आहे. १३ व्या विधानसभेच्या सातव्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.

राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी राष्ट्रगीताची धून
नागालँडच्या विधानसभेचे कमिशनर आणि सचिव पी. जे. अँटनी यांनी १३ व्या विधानसभेच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी आणि नंतर राष्ट्रगीत वाजवल्याचे सांगितले. देशातील बहुसंख्य राज्यामध्ये विधानसभेचे कामकाज राष्ट्रगीताने करण्याची परंपरा आहे. नागालँडमध्ये ही परंपरा नव्हती. नागालँडची विधानसभा २००७ मध्ये या नव्या इमारतीत स्थलांतरित झाली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष शरिंगेन लॉन्गकुमर म्हणालेत, विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी राष्ट्रगीत म्हटले जावे, अशी भूमिका मी मांडली होती. सरकारने माझा प्रस्ताव स्वीकरला, असे शरिंगेन लॉन्गकुमर म्हणाले.

१९६३ ला नागालँडची स्थापना
नागालँड १९६३ पर्यंत नागालँड आसामा राज्याचा भाग होता. १ डिसेंबर १९६३ ला नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. नागालँडमध्ये १९६४ मध्ये निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकार सत्तेवर आले. फेब्रुवारी १९६४ मध्ये विधानसभा गठित झाली. नागालँडच्या विधानसभेला ५८ वर्षे पूर्ण झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER