भारतीय राजकारणातला ऐतिहासिक किस्सा! जी.एम.सी बालयोगीमुळं एका मतानं पडलं होतं वाजपेयींचं सरकार !

हैद्राबादच्या बेगमपेट विमानतळावरुन एक विमान दिल्लीच्या दिशेनं झेप घेते. दि. २३ मार्च १९९८ची ही गोष्ट. या विमानात एक खासदारही होते. त्यांना माहित नव्हतं की पुढच्या काही तासात अशा घटना घडणार आहेत, ज्यामुळं भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होणार होता. काही मिनीटातच विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरलं. आणि विमानात अनाउंसमेंट झाली. “मिस्टर बालायोगी, तेलगू देसम खासदार तेलगू देसम पार्टी.. सर्वात आधी खाली उतरतील, इट्स इमेरजेंसी”

विमानातली ही घोषणा बालायोगींसाठी (GMC Balayogi) मोठा धक्का होती. ते खाली उतरले. तिथं आंध्रप्रदेशच्या रेसिडेंट कमिशनरांनी त्यांना गाडीत बसवताना सांगितलं, “सर, तुम्ही एनडीए आणि डिडीपीकडून लोकसभेच्या सभापती पदाचे उमेदवार आहात. म्हणून तुम्हाला थेट संसदेत नेत आहोत. तिथं तुम्ही अर्ज भरायचाय.”

बालायोगी या धक्क्यासाठी तयार नव्हते. सत्तारुढ भाजप युतीला त्यांच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री नव्हती. त्यामुळं युपीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगू देसम पार्टीशी संगनमत करण्याचा भाजपने निर्णय घेतला. त्यावेळी काही दिवसांपूर्वी अशी अवस्था होती की तत्कालीन गृहमंत्री अडवाणी यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेऊन पी.ए. संगमांना समर्थन देणारं असल्याचं सांगितलं. संगमांची निवड पक्की होती. पण त्या रात्री जॉर्ज फर्नांडिस आणि चंद्रबाबूंच्यात झालेल्या चर्चेमुळं बालायोगींच सभापती बनणं पक्क झालं आणि वाजपेयी सरकार टिकेल यावर मोहोर बसली.

गंती मोहन चंद्र बालयोगी म्हणजेच जी.एम.सी बालयोगी. दलित समाजाचे पहिले नेते ज्यांना लोकसभेच्या सभापती पदी विराजमान होण्याची संधी मिळाली. पण त्यांच्या कारकिर्दीला राजकारणतून सुरुवात झाली नव्हती. त्यांनी वकिलीची शिक्षण पुर्ण केलं होतं. सोबतच ज्युडीशरी सर्विसेसची तयारी करायचे. १९८५ला ते या परिक्षेत पास झाले आणि न्यायाधिश म्हणून एक वर्ष काम केलं.

त्यांना नेता बनायचं होतं. म्हणून त्यांनी न्यायाधिश पदाचा राजीनामा दिला. काकीनाडामध्ये त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तो काळ होता फिल्मी जगाताशी जोडल्या गेलेल्या एन.टी.रामाराव आणि त्यांच्या तेलगू देसम पार्टीचा. बालायोगींनी स्वतःला तेलगू देसम पार्टीशी जोडून घेतलं. १९८७ ला ते जिल्हापरिषदेवर निवडूण आले. तो काळ तेलगू देसम पार्टीचा होता. बाला यादव यांचा विजय ठरलेलाच.

जिल्हापरिषद निवडणूक जिंकल्यानंतर अध्यक्ष निवडीचा विषय आला तर सर्व सदस्यांपैकी बालायोगी सर्वाधिक सक्षम नाव असल्याच समोर आलं. यानंतर बालायोगींच्या नावाच प्रस्थ वाढत गेलं. १९८९ ला टीडीपीचे दिवस फिरले आंध्रात त्यांचा सुफडा साफ झाला. रामाराव माजी मुख्यमंत्री झाले. चैतन्य रथावर स्वार होवून त्यांनी आंध्राची यात्रा सुरु केली. पार्टीच्या वाढीसाठी ते प्रतिभावंत तरुण उर्जीत चेहऱ्यांची शोधमोहीम त्यांनी सुरु केली होती. अशातच त्यांची नजर पडली पूर्व गोदावरी जिल्ह्याचे जि.प.अध्यक्ष बालयोगींवर..

१९९१ उजाडलं. एन.टी रामाराव यांनी अमालापुरच्या सुरशिक्ष मतदार संघातून बालयोगींना मैदानत उतरवलंय. राजीव गांधींच्या हत्येनंतर बनलेल्या सहानभूतीच्या लाटेमुळं बालायोगी थेट संसदेत पोहचले होते. तेलगू व्यक्तीस प्रधानमंत्री बनवण्यासाठी टीडीपीनं राजकीय भूमिकेशी तडजोड करत काँग्रेसला समर्थन दिलं. नरसिंहराव पंतप्रधान झाले. पण तरिही टीडीपीच्या नेत्यांनी सरकारला घेरायला सुरुवात केली. सरकारी धोरणांवर टीका टिप्पणी केली यात बालायोगी सर्वात पुढे होते.

१९९६च्या लोकसभा निवडणूकीत बालायोगींचा पराभव झाला. पण तोपर्यंत ते चंद्राबाबू नायडूंशी सुत जुळवण्यात यशस्वी झाले होते. सत्तेत परल्यानंतर चंद्रबाबू नायडूंनी त्यांना उच्च शिक्षणमंत्री बनवलं.

१९९८पर्यंत मध्यवर्ती निवडणूका आल्या. बालायोगी अमालापुरम मतदार संघातून लोकसभेत पोहचले. आणि सभापती पदाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली.

बालायोगींच्या त्या निर्णयामुळं वाजपेयींच सरकार पडलं

१९९९ला अण्णाद्रमुकच्या सुप्रिमो जयललितांनी केंद्रातल्या वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. वाजपेयींवर बहूमत सिद्ध करण्याची वेळ आली. दिड दिवस बहूमत प्रस्तावासंबंधी गोंधळ सुरु होता. ओडीसाचे नवनियुक्त मुख्यमंत्री गिरधर गमांग सभागृहात आले. गमांग यांच्याकडे अजून लोकसभेचे सदस्यत्व होते.

एकाच वेळी दोन संविधानिक पद भोगता येत नसल्याच सांगत विरोधी बाकावरील सदस्यांनी मोठा गदारोळ सुरु केला. बहूमताचे मतदान होणार होते. त्यामुळं एका एका मताला मोठी किंमत होती.

न्यायाधिश पदाचा अनुभव असणाऱ्या सभापती बालयोगी यांनी गांभीर्याने विरोधी पक्षाची बाजू ऐकून घेतली. आणि विश्वास प्रस्तावावर त्यांनी मतदान करावं की नाही? हा निर्णय त्यांनी गमांग यांच्या ‘मनावर’ सोडून दिला. गमांग यांनी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनद्वारे मत नोंदवलं. विश्वास प्रस्तावाच्या बाजूने २५६ तर विश्वास प्रस्तावाच्या विरोधात २७० मतं पडली. सत्ता पक्षातल्या नेत्यांचे चेहरे उतरले विरोधी गोटात आनंदाचं वातावरण होतं.

परंतू सभापती बालयोगी यांनी एक चुक लक्षात आणून दिली संसदेतले एकूण सदस्या ५३९ होते. मात्र इव्हीएम वर २७०+२५६ = ५२६ मतं दाखवली जातायेत. मतांचा आकडा चुकीचा होत असल्या कारणामुळं आता मॅन्यूअल प्रोसेसिंगन मतदान होईल.

सत्ता पक्ष भाजप गटात पुन्हा उर्जा संचारित झाली. मतदान पार पडलं संपूर्ण देशाच लक्ष संसदेकडं होतं. सभापतींनी मतदानाचा निकाल जाहीर केला. सत्तापक्षाच्या बाजूनं २५९ तर सत्ता सत्ता पक्षाच्या विरोधात २७० मतं पडली. सभागृहाला अनिश्चित काळासाठी स्थगित केलं जात असल्याचा त्यांनी निर्णय दिला.

बालयोगींनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात गमांग यांना स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार दिला. गमांग यांनी मतदान केलं आणि एका मुख्यमंत्र्यामुळं एका पंतप्रधानाला पदउतार व्हावं लागलं.

पुढच्या निवडणूकीत भाजपला परत सत्ता मिळाली २४ पक्षांना एकत्र करुन भाजपनं सत्ता राखली. तेव्हाही बालायोगी यांनाच सभापती पदाची जबाबदारी होती. २७ फेब्रुवारी २००२ ला गोधरा हत्यांकांड झालं. २८ ला बजेट सादर होणार होतं पण या घटनेमुळं मोठा गोंधळ निर्माण झाला. लोकसभा स्थगीत झाली. ते आंध्रात पोहचले. त्यांना परत दिल्लीला पोहचायच होतं म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पण खराब हवामानामुळं मध्येच लँडींग करण्याच्या प्रयत्नात नारळाच्या झाडाशी टक्कर होवून बालायोगी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. आणि या अपघातातच त्यांचे निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER