शेअर बाजारात ऐतिहासिक विक्रम

Historical record in the stock market

मुंबई :- काल, सप्ताहाच्या अखेरच्या सत्रात मुंबई शेअर निर्देशांकाने (Mumbai Stock Index) ५१ हजारांची पातळी नोंदवली तर निफ्टीनेही (Nifty) अपेक्षित १५ हजारांची पातळी ओलांडून ऐतिहासिक विक्रम नोंदवला. मात्र अखेरीस बाजार बंद होताना निर्देशांक या पातळीच्या खाली बंद झाले.

बँकिंग आणि औषध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जोरदार भाववाढ झाली. माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योगांचे शेअर्स मात्र घसरले होते. या सत्रात मोठ्या कंपन्यांबरोबरच मध्यम व छोट्या कंपन्यांची घसरण झालेली होती. या सत्रात काही दलालांनी नफारूपी व्यवहार केल्यामुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबई शेअर बाजाराचा ३० प्रमुख कंपन्यांवर आधारलेला मुंबई शेअर निर्देशांक या सत्रात ५१ हजार ३१.३९ अंश पातळीवर खुला झाला. त्याने या सत्रात ५१ हजार ७३.२७ अंशांची उच्चांकी पातळी नोंदवली तर ५० हजार ५६५.२९ अंशांची नीचांकी या सत्रात नोंदवली. दिवसअखेरीस निर्देशांक ११७.३४ अंशांची उसळी मारून ५० हजार ७३१.६३ अंश पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० कंपन्यांवर आधारलेला निफ्टीही १४ हजार ९५२.६० अंश पातळीवर खुला झाला. त्याने १५ हजार १४.६५ अंशांची उच्चांकी तर १४ हजार ८६४.७५ अंशांची नीचांकी पातळी नोंदवली. दिवसअखेरीस त्यात २८.६० अंशांची वाढ होऊन तो १४ हजार ९२४.२५ अंश पातळीवर बंद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER