त्यांचं म्हणणं चुकीचं नाही, जयंत पाटील यांच्याकडून नाना पटोलेंची पाठराखण

Jayant Patil - Mama Patole - Maharashtra Today

मुंबई :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. असं विधान केले होते. आता यावर महाविकास आघाडीतील नेत्यांसह राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबद्दल प्रतिक्रिया देत पटोले यांची एकप्रकारे पाठराखण केली.

त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना अधिकार आहे, आणि आमच्या तिन्ही पक्षात अशा कोणत्याही विधानाने गैरसमज होत नाहीत. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याचं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यावर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : हे सरकार आमच्यामुळे आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सेना-राष्ट्रवादीला सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button