सरकार पडण्याची भविष्यवाणी खरी ठरणार नाही, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis and Eknath Khadse

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा भाजपा (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होतोच, मीच मुख्यमंत्री होणार होतो पण मला बाजूला सारुन दुसऱ्याला मुख्यमंत्री करण्यात आलं,असं विधान भाजपा आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खडसेंनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगावात एकनाथ खडसेंनी ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात खडसेंनी भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधल्याचं ऐकायला मिळत आहेत. या ऑडिओ क्लीपवरून गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतोच, मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण मला डावलून दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवलं याची संपूर्ण महाराष्ट्राला आहे. ‘मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर’ यातला हा प्रकार आहे असं त्यांनी सांगितले.

सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस हे मासळीसारखे तडफडत आहेत. ते ब्राह्मण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी खरी ठरणार नाही. देवेंद्र फडणवीसांना पुन्हासत्तेत आल्याचे स्वप्न पडत असतील. ते सध्या सरकार पडण्याची भविष्यवाणी करत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत. ते ब्राह्मण असल्याने त्यांचं भाकीत खरे ठरेल असं मला वाटत होतं. मात्र, त्यांचं कोणतही भाकीत खरं ठरलेले नाही असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button