हे तर ठग्स ऑफ मुंबईकर; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

ashish Shelar-CM Uddhav

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईकरांना २४ तास पाणी देऊ म्हणणा-यांनी २४ तास बार उघडे ठेवलेत, असं म्हणत शेलार यांनी गेले तीन दिवस मुंबईकर पाण्यावाचून तडफडत होते, अशी टीका शिवसेनेचं नाव न घेता केली आहे. गेली अनेक वर्षं मुंबईकरांसोबत ‘बनवाबनवी’ सुरू असून हे तर ‘ठग्ज ऑफ मुंबईकर’ असल्याची टीका शिवसेनेचे नाव न घेता केली आहे.

शेलारांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. युती तुटल्यापासून भाजप शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले या भागातील काही भागांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री फाईल आणि पेन उचलण्याचे काम करतात -नितेश राणे