हिरेन मृत्यूप्रकरणाचे नाट्य रुपांतर करणार; मुंब्र्यात एटीएसची टीम

Manshuk Hiren - ATS

मुंबई :- मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात तपास करणारी मुंबई एटीएसची टीम आज मुंब्रा रेतीबंदर परिसरात येऊन सीन रिक्रिएट करणार असल्याची माहिती आहे. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली, कुठे झाली आणि हत्या करून त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणून टाकला का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एटीएसचा प्रयत्न असणार आहे.

सीन रिक्रिएट करणार

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला. हा मृतदेह किनाऱ्यापासून ८० फूट आत आढळला. मात्र, एखाद्याची हत्याकरून मृतदेह इतक्या आतमध्ये फेकणे शक्य नसल्याचे मत मृतदेह बाहेर काढणाऱ्या क्रेनच्या चालकाने व्यक्त केले. त्यामुळे मनसुख हिरेन यांची हत्या रेतीबंदर परिसरात झाली की हत्याकरून त्यांना खाडीत फेकण्यात आले? असे प्रश्न उपस्थित झालेत. याप्रकरणी आज एटीएसची टीम रेतीबंदर परिसरात क्राईम सीन रिक्रिएट करणार आणि त्यातून या प्रश्नांची उत्तरे शोधून तपासाची दिशा ठरवणार.

सचिन वाझेंना क्राईम ब्रॅचमधून हटवलं

मनुसख हिरेनप्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भात घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वझे यांना हिरेन मनसुखप्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

या प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरू आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील, तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत. याबाबत एटीएस कोणालाही पाठीशी घालणार नाही. सचिन वझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

फडणवीस काय म्हणाले?

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे पडदास विधिमंडळात उमटत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्ज मंगळवारी (९ मार्च) वाचून दाखवला. विमला हिरेन यांच्या संशयानुसार हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांनी केली आहे. त्यामुळे वझेंना अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचे  करू नये :  संजय राऊत 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER