हिंगोली: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा कळमनुरी विधानसभेसाठी भगव्या वादळात अर्ज दाखल

हिंगोली प्रतिनिधी : शिवसेना भाजपा रिपाई रासप शिवसंग्राम रयत क्रांती महायुतीचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष लक्ष्मणराव बांगर यांचा महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आला.

कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर यांचा उमेदवारी अर्ज आज महायुतीच्या सर्व नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दाखल करण्यात आला असून यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, सुरजित सिंग ठाकूर, महाराष्ट्र उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार तानाजीराव मुटकुळे , जिल्हा परिषद अध्यक्ष शिवरानी ताई नरवाडे ,सहसंपर्कप्रमुख राजेंद्रजी शिखरे ,नगराध्यक्ष बाबाराव बांगर , शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा संपर्कप्रमुख महेश लाड, ,दिनकरराव माने, रिपाई मराठवाडा अध्यक्ष के के शिंदे, भाजपा जिल्हा सचिव दिनकरराव कोकरे ,भाजपा जिल्हा सचिव सुरेशराव नागरे ,संघटन सचिव महेश गोविंदवार ,जिल्हा उपाध्यक्ष नागोराव करंडे ,भाजपा भरत देसाई जिल्हा सचिव भाजपा डॉ. जयदीप देशमुख ,शरद पाटील ,भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर दामू अण्णा शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डिके दुर्गे ,परमेश्वर मांडगे ,भाजपा तालुकाध्यक्ष संजय,कावडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सकाराम उबाळे ,आनंदराव जगताप ,भाजपा प्रकाश नाईक, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब नाईक, माजी नगरसेवक सोनबा सावकार, बुर्से ,नंदू शेठ मणियार, भागवत ठाकूर, बालाजी हेंद्रे यांच्यासह महायुतीचे सर्व जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख ,यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी मोठा जनसमुदाय कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून कळमनुरी शहरांमध्ये दाखल झाला होता.