हिंगणघाट जळीत प्रकणातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?

hinganghat-Burning-case

मुंबई : हिंगणघाट येथील शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जाळणाऱ्या आरोपीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते आहे. मात्र पोलीस प्रशासनाने हे वृत्त फेटाळलं आहे.

विकेश नगराळेने शिक्षिकेवर भररस्त्यात पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

3 फेब्रुवारी रोजी प्राध्यापिका तरूणी कॉलेजला जात असताना हिंगणघाट चौकाजवळ ही घटना घडली. तरूणीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं. यामध्ये तरूणी 40 टक्के भाजली होती. मात्र चेहरा पूर्णपणे भाजला होता. उपचारादरम्यान या तरूणीचा 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 6 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला.

आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नागपूरच्या कारागृहात विकेशची रवानगी करण्यात आली. येथे विकेशन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. विकेशने ब्लॅंकेटच्या चिंधीने गळफास लावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. मात्र, जेल चे सुप्रीटेंडेंट आणि इतर अधिकारी मात्र ही हे वृत्त फेटाळत आहे .

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल