‘हिंदुत्व’ हृदयात, देश संविधानानेच चालणार; संजय राऊतांनी भाजपाला ठणकावले

Sanjay Raut

मुंबई :- मंदिरे खुली करण्याच्या विषयावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर अजून वाद-विवाद सुरू आहे. यात हिंदुत्व हे शिवसेनेचा श्वास असून ते आमच्या हृदयात आहे. देश आणि राज्य संविधानानुसारच चालते, असे उत्तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला दिले.

राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी देशात हिंदुत्वाची मशाल तेवत ठेवली. त्यामुळे शिवसेनेला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही आणि कुणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री ही पदे सांविधानिक आहेत. धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे तत्त्व असल्याने त्यानुसारच सगळ्यांनी कारभार केला पाहिजे. राज्य हे संविधानानुसारच चालले पाहिजे.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत हे फार विद्वान आहेत : चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER