देव नाकारणाऱ्या चार्ल्स डार्विनवर हिंदू धर्म ग्रंथाचा प्रभाव होता!

Maharashtra Today

‘मी एक आजारी, वृद्ध व्यक्ती आहे. ज्याच्याकडे अनेक कामं आधीपासून बाकी आहेत. अशात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन मी तुमचा वेळ वाया घालवू इच्छित नाही कारण पुर्ण उत्तर देणं शक्य नाहीये. विज्ञानाचा आणि येशूचा काहीच संबंध नाहीये. मी मानक नाही की ईश्वाराच्या कोणत्याच दुतानं सृष्टीची निर्मिती केली. ‘ या ओळी आहेत चार्ल्स डार्वीन(Charles Darwin ) यांच्या. त्यांनी हे पत्र लिहलं होतं. १८७९साली एका जर्मन विद्यार्थ्याला.

धर्मावर सडेतोड बोलणं डार्विन यांनी बऱ्याचदा टाळलं. असं असताना देखील त्यांच्या अनेक पत्रांमध्ये धर्माविषयचे उल्लेख आढळतात. त्यांच्या अनेक पुस्तकात देखील त्यांनी ही गोष्ट बऱ्याचदा बोलून दाखवलीये. ख्रिश्चन धर्मातील तत्वज्ञानातील चमत्कारीक गोष्टींना डार्विन यांनी नेहमी विरोध केला.

पाश्चिमात्य संस्कृतीला चुकिचं समजणाऱ्या सुधारणावादी डार्विन यांना पुर्वेकडील हिंदू धर्म आकर्षित करायचा. डार्विन यांच्या ‘मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतांना’ बिंदू धर्मातील अनेक मान्यता समर्थन देणाऱ्या वाटयच्या त्या पुढिल प्रमाणं

मत्स्य- हिंदू पुराणांमध्ये भगवान विष्णूचा पहिला अवतार मासा होता. माशापासून मानवाची निर्मिती झाली ही मान्यता आहे. डार्विन यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत ही सांगतो की जलचरापासून जीवसृष्टी फुलायला मदत झाली.

कासव- भगवान विष्णूंचा कासव हा दुसरा अवतार होता. कासव हा उभयचर आहे. डार्विन यांच्या सिद्धांतानूसार पाण्यातूनच पहिल्यांदा जीव जमिनीवर आला आणि त्याच्यापासून सृष्टी निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली.

हिंदू संस्कृती आणि डार्विन यांच्यातील समानतेचा उल्लेख स्वामी विवेकानंदांनी देखील केला होता. जवाहर नेहरुंनी देखील हा तर्क अनेक सभांमध्ये बोलून दाखवला. नेहरूंनी ‘भारताचा शोध’ या त्याच्या प्रसिद्ध पुस्तकातदेखील हा उल्लेख केलाय.

डार्विनचा सिद्धांत आणि हिंदू पुरणांची जुळणऱ्या धारणा हे सिद्ध करत नाहीत की डार्विन हिंदूत्त्ववादी होते. केवळ एक योगायोग म्हणून या गोष्टींकडे आपल्याला पाहता येईल. ‘बिगल’ या जहाजावरुन त्यांनी प्रवास सुरु केला होता. त्याआधी हिंदू धर्मातील साहित्याचा त्यांनी पुरेपुर अभ्यास केला होता. त्यावेळी त्यांनी उत्क्रांतीबद्दल विचार ही केला नव्हता. हिंदू धर्माच्या साहित्याच्या अभ्यासातूनच त्यांना उत्क्रांतीच्या संशोधनाची प्रेरणा मिळाली का असा ही प्रश्न उपस्थीत होतो. या प्रश्नाचे उत्तर होकार आणि नकार दोन्ही प्रकारात देता येणं शक्य आहे.

स्वतः डार्विन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहलं होतं, “बिगल यात्रेवर निघण्याआधी मला माहिती होतं. जुना करार (यहुदी धर्मियांचे नियम, सिद्धांत आणि पौराणिक कथा) यांच्यावर हिंदू धर्मावरील पुस्तकांइतका विश्वास ठेवणं अशक्य आहे.”

अखेर

१८ एप्रिल १८८२ मध्ये एनझाईमा पेक्टरिस या आजारामुळे त्यांना ह्नदयाचा झटका आल्याने डार्विन यांचा मृत्यू झाला. त्यांनी परिवाराला धिर धरण्यास सांगतांना म्हणाले होते , ‘‘म मृत्यचेय वाटत नाही. माझ्याजवळ एक चांगलं कुटूंब आहे मग मला भिती कशाची?” त्यांच्या ईच्छेप्रमाणे त्यांना मेरी चर्चयार्ड मध्ये दफन करण्यात आले होते. त्यांना ब्रिटिश राजांनी वेस्टमिनिस्टर ऐबी हा पुरस्कार देवून सन्मानीत केले.

शेवटच्या क्षणांमध्ये त्यांना भेटणाऱ्या सर्वांचे त्यांनी धन्यवाद मानले. त्यांच्या अंतिम यात्रेत शिक्षक, विदयार्थी, वैज्ञानिक, मित्र, नातेवाईक सरकारी यंत्रणा सर्वांनी त्यांना अंतिम विदाई दिली. चार्ल्स यांनी मांडलेल्या सिध्दांतांचा आजही अभ्यास केला जातो. त्यांच्या ठरविलेल्या मापदंडांना आजही मान्यता आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button