हिंदू देवतांना अपमान सहन करणार नाही; ‘तांडव’बाबत महाराष्ट्र सरकारचा इशारा

Tandav - Jayant Patil

मुंबई :- अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) दिग्दर्शित ‘तांडव’मध्ये (Tandav)  हिंदू देवीदेवतांचा अवमान केल्याचा आरोप देशभरातून होतो आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने, हिंदू देवतांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला आहे.

या सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्याला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर वेब सीरिज ‘तांडव’ गेल्या काही दिवसांपासून या वादामुळे चर्चेत आहे. काही राज्यांमध्ये या मालिकेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या मालिकेवर बंदी टाका, अशी मागणी देखील होते आहे.

‘महाराष्ट्र सरकार हिंदू देवीदेवतांचा अपमान सहन करणार नाही. कुणीही हिंदू देवीदेवतांबाबत चुकीचे वागावे अशी आमची अपेक्षा नाही. या प्रकरणात गृहमंत्री सर्व आरोप पडताळून पाहतील आणि गरज भासल्यास एफआयआर नोंदवला जाईल.’  असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातही विविध ठिकाणी या मालिकेला विरोध होतो आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते राम कदम यांनी, या मालिकेत भगवान शंकराची थट्टा करणारा भाग हटवा. अभिनेता झिशान अयूब याने यासाठी माफी मागावी, अशी मागणी केली. मालिकेचे निर्माता दिग्दर्शक यांनी हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागायला हवी, असे ते म्हणाले. त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल करीत मालिकेचे निर्माता, निर्देशक आणि अभिनेत्यांविरोधात अ‌ॅट्रोसिटी कायदा अंतर्गत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

ही बातमी पण वाचा : ग्रा. पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही, जयंत पाटलांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER