हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील: राज्यपाल

हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील- राज्यपाल

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी हिंद केसरी श्रीपती शंकर खंचनाळे (Hindkesari Shripati Khanchanale) यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू, देशातील पहिले हिंदकेसरी श्री. श्रीपती शंकर खंचनाळे यांचे कोल्हापूर येथे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. आपले आयुष्य त्यांनी कुस्तीच्या प्रचार व प्रसारासाठी वेचले तसेच अनेक उत्तम मल्ल घडवले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER